मुंबई,दि.23 :केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आणि राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांच्यापुढाकाराने सी.एस. आर. निधीच्या माध्यमातून अनुसूचित जाती व जमाती घटकांचा उद्योजकता विकासासंदर्भातउद्या दि. 24 एप्रिल रोजी सह्याद्री अतिथीगृह येथे दुपारी 3 वा. बैठक आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीला उद्योग क्षेत्रातील टाटा ट्रस्ट, बिर्ला ग्रुप, महिंद्रा आणि महिंद्रा, ओ.एन.जी.सी., बॅंक ऑफ बडोदा, जी. आय.सी., युनियन बॅंक, टोयोटा, जिंदाल पॉवर ॲण्ड स्टील यांसारख्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील आस्थापनाचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. तसेच या बैठकीमध्ये राज्यशासनाचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आणि आदिवासी विकास विभाग सहभागी होणार असून या बैठकीस कौशल्य विकास विभागामार्फत सादरीकरण करण्यात येणार आहे.
याबैठकीचेथेटप्रक्षेपणफेसबुकच्याhttp:/www.facebook.com/socialjusticeandspecialassistanceआणि ट्विटरच्या http:/www.twitter.com/csrcellया लिंकवर करण्यात येणार आहे. सदर बैठकीचे आयोजन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ व फोरम फॉर एस.सी./एस.टी. पार्लमेंट्रीयन्स ऑफ लेजिस्लेटर यांच्या सहयोगाने करण्यात आले आहे.
0 0 0
No comments:
Post a Comment