Monday, 23 April 2018

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीष बापट


मुंबई,दि.23: माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित जय महाराष्ट्रकार्यक्रमात  सार्वजनिक शिधा वितरण व्यवस्थेचे बळकटीकरणया विषयावर अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट आणि या विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक यांची विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून मंगळवार दि.24 एप्रिल रोजी संध्याकाळी 7.30 ते 8 या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदिका मनाली दीक्षित यांनी ही मुलाखत घेतली आहे.
            शिधा वितरण प्रणालीचे संगणकीकरण, शिधापत्रिकाचे डिजिटायजेशन व आधार लिंकिंग, ई -पॉस मशिन, के. वाय. सी सुविधा, महिला बचतगटांना शिधा वितरण केंद्रांचे वाटप, दुकानदारांसाठी थेट द्वारपोच योजना तसेच बोगस शिधापत्रिकांना आळा घालण्यासाठी राबविण्यात येणारी मोहीम याबाबतची सविस्तर माहिती श्री. बापट आणि श्री. पाठक यांनी  जय महाराष्ट्रकार्यक्रमातून दिली आहे.
००००

No comments:

Post a Comment