मुंबई,दि.23:माहिती व
जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित “दिलखुलास”कार्यक्रमात ‘सार्वजनिक शिधा वितरण व्यवस्थेचे बळकटीकरण’ या विषयावर अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट
आणि या विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक यांची विशेष मुलाखत घेण्यात आली आहे.ही
मुलाखत मंगळवार दि. 24 आणि बुधवार दि. 25 एप्रिल रोजी आकाशवाणीच्या अस्मिता
वाहिनीवरून सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदिका मनाली
दिक्षीत यांनी ही मुलाखत घेतली आहे.
शिधा वितरण प्रणालीचे संगणकीकरण, शिधापत्रिकाचे डिजिटायजेशन व आधार लिंकिंग, ई -पॉस मशिन, के.वाय.सी सुविधा, महिला बचतगटांना
शिधा वितरण केंद्रांचे वाटप, दुकानदारांसाठी
थेट द्वारपोच योजना तसेच बोगस शिधापत्रिकांना आळा घालण्यासाठी राबविण्यात येणारी
मोहीम याबाबतची सविस्तर माहिती श्री. बापट आणि श्री. पाठक यांनी “दिलखुलास”कार्यक्रमातून दिली आहे.
००००

No comments:
Post a Comment