Friday, 25 May 2018

विशेष वृत्त कुठं आम्रवन तर कुठे जंबुवन.. स्व. उत्तमराव पाटील उद्यानांमधून साकारताहेत विविध प्रकारची उपवने






मुंबई, दि. 25 : राज्यात  प्रत्येक जिल्ह्यात दोन यापद्धतीने ६८ स्व. उत्तमराव पाटील वन उद्यानांची निर्मिती होत असून यामधून साकारताहेत फळवन, चंपकवन, कदंबवन, अशोकवन, आम्रवन, जंबुवन, वंशवन, मदनवृक्ष वन, चरक वन, लता वन, सारिका वन मगृसंचार वन, अतिथीवन यासारखी विविध प्रकारची वने. प्रिय व्यक्तीच्या नावे वृक्षारोपण करून उद्यानांमधून स्मृतिवने ही निर्माण केली जात आहेत.
निरनिराळ्या वृक्षप्रजातींचे समूह निर्माण करण्यासाठी उद्यानात वेगवेगळी उपवने निर्माण करण्याला प्रोत्साहन देण्यात आले आहे. यामाध्यमातून दुर्मिळ, औषधी आणि सुंदर वृक्ष प्रजातीचे जतन आणि संवर्धन ही होत आहे.  शहरांमधील नागरिकांमध्ये विशेषत: विद्यार्थ्यांमध्ये वृक्षप्रजाती आणि वन्यजीवांविषयी आस्था निर्माण व्हावी, त्यांचे या गोष्टींकडे लक्ष आकर्षित व्हावे यासाठी त्यांना या उद्यानात अभ्यासाबरोबर क्रीडा-व्यायाम आणि मनोरंजनाची साधने देखील उपलब्ध करून दिली जात आहेत. वृक्ष-लतांचे महत्व आणि उपयोगिता सांगणारे पुस्तक संग्रहालय निर्माण करण्याचे व त्याद्वारे या सर्व माहितीचा प्रचार आणि प्रसार करण्याचेही यात नियोजित आहे.
अशी विविध प्रकारच्या वृक्ष प्रजातींची वने निर्माण केल्यास भावी पिढीला आपण सुरक्षित आणि संपन्न वृक्ष प्रजातींचा ठेवा देऊ शकू हा या विविध वनांच्या निर्मितीमागील उद्देश असून योजनेवर आतापर्यंत ६० कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च झाला आहे. 68 वन उद्याने अशी आहेत.
जिल्हा
वन उद्यानाचे स्थळ
जिल्हा
वन उद्यानाचे स्थळ
ठाणे
माजिवडा(ठाणे) कानविंदे (शहापूर
रायगड
कार्लेखिंड, चौले, ता. अलिबाग
पालघर
टेन, पापडखिंड
पुणे
नऱ्हे आंबेगाव(हवेली), रामलिंग (शिरूर)
सोलापूर
कुंभारी, मळोली
सातारा
गुरेघर महाबळेश्वर, पारगांव-खंडाळा
सांगली
बोलावड, खांबले
कोल्हापूर
कागल, पेठवडगाव
सिंधुदूर्ग
रानबामबुली, मुलडे
रत्नागिरी
चिखली, खानु
नाशिक
पारेगाव(चांदवड) मानिकपुंज (नांदगाव), कंदाणे(मालेगाव)
अहमदनगर
नांदुरशी, आठवड
धुळे
जामखेल (साक्री), जखाणे
नंदूरबार
कोठडा, होळ तर्फे हवेली
जळगाव
कुंभारखोरी, बिलाखेड
औरंगाबाद
पाथ्री (फुलंब्री)
जालना
वनसंरक्षक प्रशि. विद्यालय जालना, दहीपुरी (अंबड)
परभणी
मानकेश्वर (जिंतुर) गंगाखेड
हिंगोली
 एआरपीएफ क्षेत्र हिंगोली, पोतरा(कळमनुरी)
बीड
नारायणगड (बीड), साक्षाळपिंप्री, सेलू आंबा (अंबाजोगाई)
लातूर
तांबरवाडी(औसा), नागझरी
उस्मानाबाद
तीर्थ(तुळजापूर),ढोकी (उस्मानाबाद)
नांदेड
बोंडार (नांदेड), वडेपुरी (लोहा)
अमरावती
उपातखेडा (अचलपूर), मदलाबाद (अमरावती)
बुलढाणा
पिंपळखुटा (सिंदखेडराजा), जनुना (खामगाव)
यवतमाळ
आंबवन (उमरखेड)
जोधळणी (कळंब)
अकोला
वाशिबां (अकोला), कुरुम (मुर्तिजापूर)
वाशिम
तपोवन (मालेगाव), रामनगर (कारंजा)
नागपूर
वेणा(नमजी) कळमेश्वर
वर्धा
एमआयडीसी वर्धा, राजणी (कारंजा)
भंडारा
डोंगरला (तुमसर),
गोंदिया
गराडा (तिरोडा), कुडवा (गोंदिया)नवाटोला (देवरी), अर्जुनी मोरगाव
चंद्रपूर
चंद्रपूर, गोणाडा (गोणाडा), गोंड पिंपरी (गोंडपिंपरी)
गडचिरोली
धानोरा (गडचिरोली)








००००

No comments:

Post a Comment