Friday, 25 May 2018

महाराष्ट्रात ई-वे बिल प्रणाली २५ मे २०१८ पासून सक्तीची




मुंबई, दि. 25 : काही वृत्तपत्रांमध्ये महाराष्ट्र राज्यांतर्गत मालाच्या वाहतूकीसाठी ई-वे बिल प्रणाली दि. ३१ मे २०१८ पासून सक्तीची केल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. या बातम्या वस्तूस्थितीदर्शक नसून महाराष्ट्रात  राज्यांतर्गत माल वाहतूकीसाठी ई-वे बिल प्रणाली दि. २५ मे २०१८ पासून सक्तीची करण्यात आलेली आहे.
महाराष्ट्र शासनाने याबाबत दि. ७ मे २०१८ रोजी अधिसुचना जारी केली असून त्यानुसार महाराष्ट्रातील राज्यांतर्गत मालाच्या वाहतूकीसाठी ई-वे बिल दि. २५ मे पासून अनिवार्य करण्यात आली आहे, सर्व संबंधितांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन वस्तू आणि सेवा कर विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
वस्तू आणि सेवा कर पद्धती ही देशपातळीवरील पहिली एक समान कर पद्धती आहे. ई-वे बिल प्रणाली ही वस्तू आणि सेवा कर पद्धतीचा महत्वाचा घटक असून राज्यांतर्गत वाहतूकीसाठी ई-वे बिल प्रणालीची अंमलबजावणी टप्प्या टप्प्याने करण्यात येत आहे.
००००



No comments:

Post a Comment