Thursday, 24 May 2018

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात परिवहन मंत्री दिवाकर रावते


 मुंबईदि. 24 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'जय महाराष्ट्र'  कार्यक्रमात परिवहन मंत्री दिवाकर रावते यांची मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत शुक्रवार दि. 25 मे रोजी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून संध्याकाळी ७.३० ते ८ या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदक मनाली दीक्षित यांनी ही मुलाखत घेतली आहे.
   परिवहन विभागामार्फत राज्यभरात राबविण्यात येत असलेल्या रस्ते सुरक्षा पंधरवड्याचे महत्वरस्ते सुरक्षा पंधरवडा आयोजनामागची भूमिकारस्ते सुरक्षाकरिता राबविण्यात आलेले विविध उपक्रम, ‘हॅार्न नॅाट ओके प्लीज’ हे अभियानशासनाने रस्ते सुरक्षा निधी उभारण्याच्या घेतलेल्या निर्णयाचे स्वरूप आणि त्या निधीचा वापर आदि माहिती श्री. रावते यांनी जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमातून दिली आहे.  
००००

No comments:

Post a Comment