मुंबई,दि.२८ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित जय महाराष्ट्र कार्यक्रमात
खादी ग्रामोद्योग महामंडळाचे अध्यक्ष
विशाल चोरडिया हे मुलाखती दरम्यान खादी ग्रामोद्योग महामंडळाची माहिती देणार आहेत.
ही मुलाखत मंगळवार दिनांक २९ मे रोजी
दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून सायंकाळी
७.३० ते ८.०० या वेळेत प्रसारित होणार
आहे. निवेदक विजय कदम यांनी ही मुलाखत
घेतली आहे.
खादी
ग्रामोद्योग महामंडळ स्थापनेमागची भूमिका, उद्योजकांच्या मालासाठी बाजारपेठ उपलब्ध करून देणे, ग्रामीण
कारागिरांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजना, महाखादी मॉडेल,
महाखादी यात्रा, मधुबन मध, पुण्यात सुरु करण्यात आलेले ग्रामोद्योग विक्री केंद्र, तरुणांसाठी राबविण्यात येणारे उपक्रम, नवउद्योजकांना मार्गदर्शन तसेच
खादी ग्रामोद्योग महामंडळाचे उपक्रम याबाबतची माहिती श्री. चोरडिया हे जय
महाराष्ट्र कार्यक्रमातून देणार आहेत.
0 0 0
No comments:
Post a Comment