Sunday, 27 May 2018

केंद्र शासनाला चार वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पुष्पगुच्छ देवून दिल्या शुभेच्छा


नागपूर दि. 26: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी शासनाला चार वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय भुपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी पुष्पगुच्छ देवून शुभेच्छा दिल्यात. तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वाढदिवसानिमीत्त अभिष्टचिंतन केले तसेच पुष्पगुच्छ देवून शुभेच्छा दिल्या.
यावेळी आमदार सुधाकर देशमुख, डॉ. मिलींद माने, कृष्णा खोपडे, सुधाकर  कोहळे तसेच महानगरपालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष विकी कुकरेजा, सत्तापक्ष नेते संदिप जोशी, जयप्रकाश गुप्ता आदि उपस्थित होते यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना वाढदिवसानिमित्त तसेच केंद्र शासनाला चार वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त शुभेच्छा दिल्या.

*******


No comments:

Post a Comment