Sunday, 27 May 2018

फळे व भाजीपाल्यासाठी कीटकनाशके आणि हार्मोन्सचा अनावश्यक वापर शेतकऱ्यांनी करू नये - कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर

मुंबईदि.२७: राज्यातील शेतकरी बांधवांनी फळेभाजीपाल्यावर अनावश्यक कीटकनाशके आणि हार्मोन्सचा। वापर टाळावाअसे आवाहन कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी आज केले. केंद्रीय कृषी मंत्रालयाकडून आलेल्या अहवालाच्या पार्श्वभूमीवर कृषीमंत्र्यांनी हे आवाहन केले आहे.
यासंदर्भात कृषीमंत्री म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यामधील शिरोळ तालुक्यातील जांभळी गावातून हिरवी मिरची निर्यात केली जाते. अलीकडे या निर्यात केल्या जाणाऱ्या हिरव्या मिरचीचे नमुने घेतले असता त्यात 'फेंप्रोपॅथीनकीटकनाशकाचा अंश अधिक प्रमाणात दिसून आल्याचे केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. 
या पार्श्वभूमीवर शेतकरी बांधवाना आवाहन करताना कृषीमंत्री यांनी सांगितले कीफळ व भाजीपाल्यावर 'ऑक्सिटोसीनसारखे हार्मोन्स आणि'मोनोक्रोटोफोससारख्या कीटकनाशकांचा अनावश्यक वापर करू नये. याच्या अतिवापरामुळे मानवी आरोग्यास धोका निर्माण होतो आणि कर्करोग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचबरोबर राज्यातील निर्यातक्षम फळेभाजीपाला यांचा योग्य दर्जा राखणे आवश्यक आहेअन्यथा आयात करणाऱ्या देशांकडून प्रतिबंध लादले जातातअसेही श्री. फुंडकर यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment