Tuesday, 5 June 2018

बारावीच्या गुणपत्रिकांचे वितरण 12 जूनला




 नागपूर दि.05 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या फेब्रुवारी/मार्च 2018 उच्च माध्यमिक परीक्षा (वर्ग 12 वी) च्या गुणपत्रिकांचे जिल्हा संकलन केंद्रावर मंगळवार, दिनांक 12 जून रोजी सकाळी 11 ते 5 वाजेपर्यत वाटप करण्यात येणार आहे.
संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अधिकार पत्रासह निकालाचे साहित्य संकलनासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन नागपूर विभागीय मंडळाचे विभागीय सचिव रविकांत देशपांडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
*****


No comments:

Post a Comment