Tuesday, 26 June 2018

खरीप कर्जपुरवठा न करणाऱ्या बँकांमधून शासकीय खाते बंद करणार - चंद्रशेखर बावनकुळे


  प्रत्येक पात्र शेतकऱ्यांना सुलभपणे कर्जपुरवठा करा
  बँकांमध्ये शेतकरी सभासदांना सन्मानाची वागणूक द्या
  एसबीआययुनियन बँकेसह चार बँकांविरुद्ध कारवाई

नागपूर दि.26 : शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी सुलभपणे तसेच बँकांना दिलेल्या उद्दिष्टाप्रमाणे कर्जपूरवठा न करणाऱ्या बँकांविरुद्ध कारवाई करतांनाच अशा बँकांमधून असलेले सर्व शासकीय खाते बंद करण्याच्या सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिल्यात.
बचत भवन येथे खरीप पीक कर्ज आढावा तसेच कर्जमाफी योजनेंतर्गत शेतकरी सभासदांना मिळालेल्या कर्जमाफीचा आढावा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला. याप्रसंगी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
यावेळी खासदार कृपाल तुमानेआमदार आशिष देशमुखडॉ. मिलींद मानेजिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती निशा सावरकरजिल्हाधिकारी अश्विन मुदगलजिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संजय यादवउपजिल्हाधिकारी सुभाष चौधरीमुख्य वन संरक्षक मल्लिकार्जून आदी उपस्थित होते.
खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना आवश्यक असलेल्या पीककर्जासाठी विविध राष्ट्रीयकृत बँकांकडून अडचणी येत असल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल घेतांना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले कीपीक कर्जासाठी बँकेत येणाऱ्या प्रत्येक सभासदांना कर्ज प्रकरणासंदर्भात आवश्यक संपूर्ण माहिती देण्याची जबाबदारी बँकेच्या शाखा व्यवस्थापकाची आहे. शासनाने कर्जमाफी दिल्यानंतर कर्जाचा बोझा कमी झाल्यामुळे त्यांना नवीन कर्ज देतांना कुठलीही अडचण जाणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच तालुकास्तरावर उपविभागीय महसुल अधिकारी तसेच तहसीलदार यांनी सर्व पात्र शेतकऱ्यांना सुरळीतपणे कर्जपूरवठा होईलयासाठी नियमित आढावा घ्यावाअशा सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्यात.
खरीप पीक कर्ज वाटपासाठी जिल्ह्याला हजार 66 कोटी रुपयाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यापैकी बँकांनी केवळ 243 कोटी म्हणजेच 24 टक्के कर्ज पूरवठा केला आहे. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून 28 कोटी रुपयाचा कर्जपूरवठा करण्यात आला असून आणखी 30 कोटी रुपये राज्य शासनाकडून उपलब्ध होणार आहेत.
कर्ज पूरवठा करण्यासाठी बँकांमार्फत आवश्यक सहकार्य मिळत नसल्याच्या तक्रारी संदर्भात बोलतांना स्टेट बँक ऑफ इंडियायुनियन बँकआयसीआयसी तसेच पंजाब नॅशनल बँक या बँकांनी दिलेल्या उद्दिष्टापेक्षा अत्यल्प कर्जपूरवठा केला आहे. त्यामुळे सहकार विभागाचे प्रधान सचिव सर्व बँकेच्या वरिष्ठ व्यवस्थापकांसोबत बैठक घेऊन आढावा घेणार आहे. अल्प कर्जपूरवठा करणाऱ्या बँकांसंदर्भात राज्य शासनाने गंभीर दखल घेतली असून बँकांनी यापुढे दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दृष्टीने दैनंदिन नियोजन करावेअसे निर्देशही पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिले.
बँकांनी उद्दिष्टपेक्षाही कमी कर्जपूरवठा करणाऱ्या बँकांमध्ये इंडियन बँक 11 टक्केपंजाब नॅशनल बँक 12 टक्केस्टेट बँक ऑफ इंडिया 14 टक्केसिंडीकेट बँक 17 टक्केयुको बँक 17 टक्केयुनियन बँक ऑफ इंडिया 20, अलाहबाद बँक 20 टक्केबँक ऑफ इंडिया 20 टक्केसेंट्रल बँक ऑफ इंडिया 18 टक्केकार्पोरेशन बँक 19 टक्केइंडियन ओवरसिस बँक19 टक्केविजया बँक टक्के आदि बँकांनी दिलेले उद्दिष्ट तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले.
शेतकऱ्यांना कर्जमाफी
जिल्ह्यात लाभार्थी शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ देण्याचे कामकाज गतीने सुरु आहे. जिल्ह्यातील 59 हजार 985 लाभार्थींना 370 कोटी 60 लक्ष रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. याशिवाय जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेशी संलग्नीत 25 हजार शेतकरी लाभार्थ्यांपैकी 18 हजार लाभार्थ्यांचा सातबारा कोरा करण्यात आला आहे.
जिल्ह्यात खरीप हंगाम कर्जवाटपाचे प्रशासनास हजार 66 कोटी रुपये वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यापैकी आतापर्यत 243 कोटी 51 लक्ष रुपयाचे वाटप करण्यात आले असून 24 टक्के उद्दीष्ट पूर्ण झाले आहे.
जिल्ह्यातील आयसीआयसीएचडीएफसीपीएनबीयुनियन बँक आदी बँकांचे कर्जमाफी तसेच कर्जवाटपासंदर्भातील कामकाज समाधान जनक नसल्याने संबंधित बँकांमध्ये असलेले शासकीय खाते बंद करण्यात यावेअशा सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्या.
महसुल सर्कलमध्ये हरित क्षेत्र निर्मिती
महसुल मंडळांतर्गत अनेक जमीनी पडित आहे. या पडित जमीनीचा रोजगार निर्मितीसह उत्पादनासाठी उपयोग करता यावा यासाठी जिल्ह्यातील महसुल मंडळ निहाय 10 एकर जमीनीचा उपयोग करण्यात येणार आहे. तालुक्यातील विविध महिला बचत गटांना एकत्रित करून त्यांना ही जमीन भाजीपाला लागवड तसेच अन्य उद्योगासाठी देण्यात येईल. याशिवाय महिला बचत गटांना शासनाच्या वतीने लागवडीसाठी अनुदान देखील देण्यात येणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यातील महसुल मंडळात हरित क्षेत्र निर्मिती करण्याचा मानस असल्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

खरीप हंगाम शेती उत्पादनाचा घेतला आढावा
खरीप हंगामाची पेरणी सुरु झाली आहे. खरीप हंगामात नागपूर जिल्ह्यात कापूससोयाबीनतूरभात अशी महत्त्वाची पीके घेण्यात येतात. मागील वर्षीचे कापसावरील बोंड अळीचा प्रादुर्भाव पाहता कृषी विभागाने शेतकऱ्यांना बोंडअळीपासून बचावाचे विविध उपाय सुचविले आहे. याशिवाय कृषी विभागाने खरीप हंगामात शेती उत्पादनात वाढ होण्याची शक्यता वर्तविली. परंतू जिल्ह्यातील ग्रामीण भागाचा दौरा करतांना कृषी विभागाचे अधिकारी कार्यालयात अनुपस्थित असतातअशी खंत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बैठकी दरम्यान व्यक्त केली. शेतकऱ्यांना हंगामाच्या काळात बी-बियाणेखतेकिटकनाशके उपलब्ध न झाल्यास कृषी विभागाच्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावेअसे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.
यावेळी अन्न सुरक्षा योजनाउज्वला योजनाशासकीय जमीनीवरील घरांसाठी असलेले अतिक्रमण नियमानुकुल करणेप्रधानमंत्री घरकुल योजनातसेच शासकीय जमीनीवर प्रधानमंत्री आवास योजनेच्या बांधकामासंदर्भात यावेळी आढावा घेण्यात आला.
*****  

No comments:

Post a Comment