Thursday, 7 June 2018

मच्छिमारांनी ‘प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजने’चा लाभ घ्यावा


 नागपूर दि.07 : केंद्र शासनाने राष्ट्रीय कल्याणकारी योजनेंतर्गत भूजलाशयीन तसेच सागरी क्षेत्रातील क्रियाशील मच्छिमारांचा नैसर्गिक आपत्ती व अन्य कारणाने मृत्यू ओढवल्यास अशा मच्छिमारांच्या वारसांना  प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजने’ चा लाभ देण्यात येणार आहे. या योजनेमध्ये सहभागी होऊन मच्छिमारांनी नोंदणी करण्याचे आवाहन मत्सव्यवसाय सहायक आयुक्त यांनी केले आहे.
केंद्र शासन सहाय्यित प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा नैसर्गिक आपत्तीकोणत्याही कारणास्तव होणारा अपघाती मृत्यूअपघातामुळे अपंगत्व आलेल्या व्यक्ती लाभ घेऊ शकतात. यामध्ये मच्छिमारांच्या वारसदारांना लाख रुपये व अंशत: अपंगत्व आल्यास त्यांच्या वारसांना लाख रुपयाचे अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. विशेष आकस्मिक धोरणांतर्गत लाभार्थ्यांना 10 हजार रुपयापर्यत वैद्यकीय खर्च देण्यात येईल. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा कालावधी 12 महिन्यांचा असून मच्छिमारांना योजनेत नाव नोंदणीसाठी कुठलेही अतिरिक्त शुल्क भरावे लागणार नाही. 
                प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा लाभ प्राप्त करण्यासाठी लाभार्थी 18 ते 70 वर्षे वयोगटातील परवाना धारक किंवा नोंदणीकृत मच्छिमार सहकारी संस्थेचा क्रियाशील सभासद असणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय कार्यालयात नोंदणी करतांना मच्छिमाराने स्वत:चे संपूर्ण नाव व पत्तामोबाईल क्रमांकजन्मतारखेचा दाखलाआधार क्रमांकबँकेचे नावपत्ताखाते क्रमांक व आयएफएससी क्रमांकनामांकन करावयाच्या व्यक्तीचे नाव व नाते या बाबींची नोंद करणे आवश्यक राहीलअशी माहिती मत्स्य व्यवसाय विभागाचे सहायक आयुक्त यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
*****

No comments:

Post a Comment