मुंबई,दि. 5:
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित आकाशवाणीच्या दिलखुलास कार्यक्रमात पर्यावरण मंत्री रामदास कदम यांची "पर्यावरण रक्षणासाठी
प्लास्टिकमुक्ती" या विषयावर मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत
आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवरून उद्या, बुधवार दि. 6 आणि
गुरुवार दि. 7 जून रोजी सकाळी 7:25 ते 7:40 या वेळेत प्रसारित होईल. निवेदक संजय भुस्कुटे
यांनी ही मुलाखत घेतली आहे.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने "पर्यावरण
रक्षणासाठी प्लास्टिकमुक्ती" संकल्पना, राज्यशासनाद्वारे प्लास्टिक व थर्मोकोलबंदीबाबत जाहीर करण्यात आलेले धोरण, प्लास्टिकचे पर्यावरणावर होणारे वाईट परिणाम, प्लास्टिक बंदीची आवश्यकता, प्लास्टिकबंदी धोरणाची पूर्वतयारी, इतर राज्यातील प्लास्टिकबंदी निर्णयाचा अभ्यास व निष्कर्ष तसेच प्लास्टिकबंदी
धोरणाच्या अंमलबजावणीसाठी करण्यात आलेल्या उपाययोजना व नागरिकांचा सहभाग या
विषयांची माहिती श्री. कदम यांनी दिलखुलास कार्यक्रमातून दिली आहे.
००००

No comments:
Post a Comment