Sunday, 8 July 2018

राज्यपाल चे. विद्यासागर राव यांचे आगमन

नागपूर,दि. 8 : राज्यपाल चे. विद्यासागर राव यांचे मुंबई येथून इंडियन एअरलाईन्सच्या विमानाने रात्रौ 8.30 वाजता दोन दिवसाच्या नागपूर भेटीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर  आगमन झाले. महापौर श्रीमती नंदाताई जिचकार यांनी राज्यपालांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.
यावेळी विमानतळावर विभागीय आयुक्त अनुप कुमार, पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, महानगर पालिका आयुक्त विरेन्द्र सिंग, जिल्हा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे आदींनी राज्यपाल चे. वि

द्यासागर राव यांचे स्वागत केले. स्वागताचा स्विकार करुन राज्यपालाचे राजभवनाकडे प्रयाण झाले.
राज्यपाल चे. विद्यासागर राव यांचा सोमवार दि. 9 जुलै व मंगळवार दि. 10 जुलै रोजी राजभवन येथे मुक्काम आहे.


                                                         *****

No comments:

Post a Comment