नागूपर, दि. 6 : 13 कोटी वृक्षलागवड मोहिमेतंर्गत लेखा व कोषागारे विभागाचे प्रधान सचिव नितीन गद्रे यांच्या
हस्ते आज हिंगणा येथील उपकोषागार कार्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
प्रत्येक व्यक्तीने वृक्ष लागवड करुन त्याचे संगोपन करावे, असे यावेळी त्यांनी सांगितले.
या वृक्षारोपण
कार्यक्रमप्रसंगी लेखा व कोषागार नागपूर
विभागाचे सहसंचालक विजय कोल्हे, जिल्हा कोषागार अधिकारी दीपाली राऊत, सहायक संचालक
शुभदा चिंचोळकर, उपकोषागार अधिकारी मिथिलेश सोनकांबळे, लेखा अधिकारी सुभाष गोसावी,
शैलेश कोळे, धर्मराज गोले, अमित मुराडिया आदी उपस्थित होते.
हरित पर्यावरण व प्रदूषणमुक्त
महाराष्ट्रासाठी राज्यात 1 ते 31 जुलै 2018 या कालावधीत वृक्षलागवड मोहीम
राबविण्यात येत आहे. लोकसहभागातून राबविण्यात येत असलेल्या या मोहिमेला सर्वच
स्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शासकीय इमारतींच्या आवारातसुध्दा मोठया
प्रमाणात वृक्षलागवड होत आहे. हिंगणा येथील कोषागार कार्यालयाच्या परिसरामध्ये भर
पावसात श्री. गद्रे यांनी आज वृक्ष लागवड करुन सर्वांनी एक तरी झाड लावण्याचा
संदेश दिला.
***

No comments:
Post a Comment