राज्यात
वृक्षलागवडीचा “गजर”
संकल्पपूर्तीची
हॅटट्रीक
मुंबई
दि. २७ राज्यात सलग तिसऱ्यावर्षी वृक्षलागवडीचा संकल्प पूर्णत्वाला गेला असून
लोकसहभागातून राज्यात आज दुपारी ४ वाजून १५ मिनिटांच्या नोंदीप्रमाणे १३ कोटी ४८ हजार ००५ वृक्ष लागले आहेत. हे केवळ लोकसहभागामुळे शक्य
झाल्याची प्रतिक्रिया देतांना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वृक्षलागवडीत
सहभागी झालेल्या सर्व व्यक्ती, संस्था, व्यापारी- उद्योजक,
राज्याच्या प्रशासकीय यंत्रणेतील सर्व प्रशासकीय विभागांचे प्रमुख, विभागीय
आयुक्त, महानगरपालिका आयुक्त, जिल्हाधिकारी आणि इतर शासकीय-निमशासकीय यंत्रणेचे
आभार मानले आहेत.
|
१३ कोटी वृक्षलागवडीचा
असा झाला “गजर”
१
जुलै पासून राज्यात १३ कोटी वृक्षलागवड मोहिमेला सुरुवात झाली आणि हळुहळू
लोकसहभागातून वृक्षलागवडीचा “गजर” राज्यभर दुमदुमू लागला. आज शिखरावर
असलेल्या या गजराने संकल्पपूर्तीचा जल्लोष केला आणि सव्वा चार वाजता प्राप्त
झालेल्या माहितीनुसार राज्यात १३ कोटी ४८ हजार ५ झाडं राज्यात लागली.
यामध्ये
वन विभागाने ७ कोटी ९४ लाख ९८९० वृक्ष लावले. वनेत्तर क्षेत्रात ४ कोटी ६४ लाख
६९ हजार २५३ रोपे लागली. माय प्लांट या
मोबाईल ॲपद्वारे वन विभागाकडे २ लाख ६४ हजार ५१० रोपे लावल्याची नोंद झाली. रोपे
आपल्या दारी या उपक्रमातून २ लाख ५० हजार ७११ रोपे राज्यात लागले असल्याची
माहिती वन विभागाला मिळाली. हॅलो
फॉरेस्ट १९२६ या हेल्पलाईनवर राज्यात ११७९० रोपं लागल्याची माहिती प्राप्त
झाली. ही सगळी माहिती वन विभागाला
ऑनलाईन पद्धतीने प्राप्त झाली आहे. ऑफलाईनपद्धतीने वन विभागाकडे प्राप्त
झालेल्या माहितीनुसार १ कोटी २३ लाख ६४ हजार ३५२ रोपे लागली आहेत. ऑनलाईन आणि
ऑफलाईनची संख्या मिळून राज्यात सव्वा चार वाजता १३ कोटी ४८ हजार ५ झाडं
लागल्याची नोंद झाली आहे.
राज्यात सर्वाधिक वृक्षलागवड नांदेड जिल्ह्यात झाली आहे ती ८२ लाख २६
हजार ०९६ इतकी आहे. नाशिक जिल्हा ७१ लाख ५६ हजार ०५० वृक्षलागवडीसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. चंद्रपूर जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर असून
येथे ६६ लाख ५६ हजार ४४३ रोपे लागली आहेत. यवतमाळ जिल्हा चौथ्या क्रमांकावर आहे
इथे ६४ लाख ९० हजार ५३१ वृक्ष लागले आहेत. पाचव्या क्रमांकावर औरंगाबाद जिल्हा
आहे. येथे ५४ लाख ९८ हजार ७४३ रोपे
लागली आहेत..
|
सलग
तिसऱ्यांदा वृक्षलागवडीची संकल्पपूर्ती झाली आहे असे सांगून श्री. मुनगंटीवार
म्हणाले, राज्यात २०१६ ला एका दिवसात दोन कोटी वृक्षलागवडीचा संकल्प
करण्यात आला होता. लोकसहभागातून राज्यात २ कोटी ८२ लाख वृक्ष एका दिवसात लागले. या
वृक्ष लागवडीची नोंद लिम्का बूक ऑफ रेकॉर्डस् मध्ये घेण्यात आली. त्यानंतर २०१७ ला
१ जुलै ते ७ जुलै २०१7 या
वनमहोत्सवाच्या काळात ४ कोटी वृक्षलागवडीचा संकल्प होता. तो ५ कोटी ४३ लाख वृक्ष
लागून पूर्णत्वाला गेला. या वृक्षलागवडीचीही लिम्का बूक ऑफ रेकॉर्डसमध्ये नोंद
घेण्यात आली. यावर्षी २०१८ च्या पावसाळ्यात १ जुलै ते ३१ जुलै २०१८ या कालावधीत १३
कोटी वृक्षलागवडीचा संकल्प होता. उद्दिष्टाच्या चार दिवस आधीच १३ कोटी वृक्षलागवडीचा
संकल्प पूर्णत्वाला गेला. राज्यातील अबालवृद्धांनी ना केवळ वृक्षलागवडीत सहभाग
नोंदवला परंतू आपण पर्यावरणस्नेही असल्याचेही दाखवून दिले. या सर्वांच्या अमूल्य
योगदानानेच हा संकल्प देखील पूर्णत्वाला गेला आहे.
सलग
तीन वर्षे वृक्षलागवडीचा केलेला संकल्प राज्यातील पर्यावरणप्रेमी नागरिकांमुळे
पूर्णत्वाला जात आहे. यावर्षीही वृक्षलागवडीत लोकांनी उर्त्स्फुतपणे सहभाग
नोंदवला. जवळपास ३१ लाख ४६ हजारांहून अधिक नागरिक यात सहभागी झाले 1 लाख ४५ हजार ६८३ स्थळांवर वृक्षारोपण करण्यात आले. शाळेतील
विद्यार्थ्यांपासून वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांपर्यंत आणि व्यापारी
उद्योजकांपासून सामाजिक, स्वंयसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनी,
अध्यात्मिक संस्थांच्या प्रतिनिधींनी आणि कला क्षेत्रातील
मान्यवरांनी, विविध शासकीय विभागांनी यात सहभागी होऊन झाडं
लावली. या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांनी, दिलेल्या खंबीर
सहकार्याने हरित महाराष्ट्राचे स्वप्नं साकार करण्याच्या दिशेने महत्वपूर्ण पाऊले
पडत आहेत.
आता महावृक्षलागवडीचा ५० कोटीतील तिसरा आणि
शेवटचा महत्वाचा टप्पा म्हणजे पुढील वर्षी होणारी ३३ कोटी वृक्षलागवड आहे. यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित
रोपवाटिका विकसित करणे, उत्तम आणि दर्जेदार रोपांची निर्मिती
करणे, लॅण्ड बँकेची निश्चिती करणे, वृक्षलागवडीमध्ये
अधिकाधिक लोकांना सहभागी होण्यासाठी संधी निर्माण करून देणे ही सगळी कामे सुरु
आहेत. मला विश्वास आहे की ज्याप्रमाणे तीन वर्षात राज्यातील जनतेने वृक्षलागवडीचा
लोकोत्सव साजरा केला त्याचप्रमाणे ३३ कोटी वृक्षलागवडीत ही ते त्याच उत्साहाने
सहभागी होतील आणि हरित महाराष्ट्राच्या निर्मितीमध्ये आपले योगदान देतील.
00000
No comments:
Post a Comment