Sunday, 29 July 2018

भेसळयुक्त अन्नाचे नमुने आठ दिवसात तपासून द्यावे नविन इमारत व प्रयोगशाळेव्दारे कामाची गतिमानता वाढवावी - केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी

नागपूर दि.29: शुध्द  व भेसळरहीत अन्न मिळणे हा सामान्यांचा अधिकार आहे.अन्न व औषध प्रशासनाच्या प्रस्तावित प्रयोगशाळेतुन सामान्य नागरीकांना आठ दिवसांच्या आत अन्न नमुने तपासून द्यावेत अशी अपेक्षा केंद्रीय रस्ते वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांनी आज व्यक्त केली.
अन्न व औषध प्रशासन विभागाच्या  प्रयोगशाळा तसेच इमारतीचे भूमिपूजन आज करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अन्न व नागरी पुरवठा व अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट, राज्य मंत्री मदन येरावार,आमदार सुधाकर कोहळे, आमदार अनिल सोले, वैद्यकीय शिक्षण व औषधी विभागाचे सचिव संजय देशमुखअन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त डॉपल्लवी दराडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता उल्हास देबडवार, कार्यकारी अभियंता जनार्दन भानुसे, उपअंभियंता ए.पी. देशमुख  आदी उपस्थित होते.
अन्न व औषध प्रशासनाने जनतेला वेळेत व ऑनलाईन सेवा द्याव्यात. पारदर्शक व भष्ट्राचारमुकत  सेवेच समाधान जनतेला व शासनाला  या विभागाने द्यावे असे सांगुन श्री.गडकरी म्हणाले की अनेक वर्षापासुनची या प्रयोगशाळेसाठी असलेली मागणी पुर्ण होत असल्याने त्यांनी  शासनाचे आभार मानले. या सहा मजली इमारतीला प्रशस्त पार्कीग, ई कारसाठी पार्कीग,  ग्रीन बिल्डींग, सौर उर्जेवर आधारीत प्रकाश यंत्रणा तसेच कार्यालयाबाहेर सुंदर लॅण्डस्केप करण्याची सुचना त्यांनी सार्वजनिक बांधकाम  विभागाला केली.  पाश्चिमात्य देशात  अन्न व औषधांना देण्यात येणारे उच्च मुल्य या विभागाने द्यावे तसेच मोठया उद्योजकांनी सुध्दा अन्नशुध्दीला प्राधान्य द्यावे. आठ दिवसात नमुने तपासणी व भेसळीचा गुन्हा सिध्द झाल्यावर गुन्हेगारांचे फोटो हे माध्यमांनी प्रसीध्द करावे जेणेकरून गुन्हेगारांना सामाजिक जरब बसेल असेही त्यांनी सांगीतले.
            जनतेला सकस व शुध्द अन्न मिळण्यासाठी विभागामार्फत राज्यात अदयावत प्रयोगशाळा उभारण्यात आल्यात. राज्यातील ही तिसरी प्रयोगशाळा आहे.अन्न व औषध प्रशासनातर्फे सामान्य जनतेला चांगली सेवा देण्यासाठी या अद्ययावत प्रयोगशाळेची  मदत होईल असे सांगुन राज्यमंत्री मदन येरावार म्हणाले की या प्रयोगशाळेत पाच हजार अन्नाचे तसेच दोन हजार औषधाचे नमुने तपासण्याची सुविधा असेल.येत्या दोन वर्षात ही सुसज्ज वास्तु नागरीकांच्या सेवेत रूजु होईल अशी ग्वाही त्यांनी  यावेळी दिली.
अन्न व औषध प्रशासन हा विभाग सामान्यांशी जुळलेला आहे. गेल्या वर्षभरात 150 कोटी रूपयांचा गुटखा विभागामार्फत जप्त करण्यात आल्याचे   मंत्री गिरीष बापट यांनी सोगीतले. भेसळमुक्त अन्नासाठी   विभागामार्फत गतिने कारवाई करण्यात येते.जुन्या कायदयातील त्रुटीवर अभ्यास करून अन्न भेसळ करणा-यांना कडक शासन करणारा कायदा मंत्रीमंडळासमोर ठेवणार असल्याचेही त्यांनी सांगीतले.अन्न्‍  व औषध प्रशासनामार्फत राज्यातील धार्मीक स्थळीसुध्दा मोठया स्वरूपात अन्न शिजविण्यात येते.तिथे विभागामार्फत धडक प्रशीक्षणाचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे.शुध्द अन्न सामान्यांना मिळावे म्हणुन  कायदयासोबतच प्रबोधन सुध्दा गरजेचे आहे .दुधात होणारी भेसळ ही चिंताजनक असुन भेसळ करणा-यांना कडक शिक्षेचे प्रयोजन  नविन कायद्यात केले आहे. नविन कायद्यात कमीतकमी तीन वर्षे एवढया शिक्षेची तरतुद केली असल्याचेही त्यांनी सांगीतले.        
यावेळी  केंद्र शासनाच्या अन्न सुरक्षा व मानके विभागाच्या वतीने अन्न सुरक्षेवर काढलेल्या माहितीपत्रीके चे प्रकाशन करण्यात आले.                                                                                      
 कार्यक्रमाचे  प्रास्ताविक सचिव संजय देशमुख, संचालन रेणुका देशकर तर आभार सहआयुक्त  शशिकांत केकरे यांनी मानले.


****

No comments:

Post a Comment