Monday, 9 July 2018

विभागीय लोकशाही दिनात एक तक्रार प्राप्त


नागपूर दि. 09 : उपायुक्त संजय धिवरे यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभाकक्षात घेण्यात आलेल्या विभागीय लोकशाही दिनात नागरिकांकडून 1 तक्रार स्वीकारण्यात आली. प्राप्त तक्रारींमध्ये जिल्हाधिकारी, नागपूर व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयासंबंधी एक तक्रारीचा विभागीय लोकशाही दिनात समावेश होता. यावेळी नवीन 3 प्रकरणात चर्चा करण्यात आली तसेच जुन्या 8 तक्रारींवर सुनावणी घेण्यात आली.
            या लोकशाही दिनाला विशेष पोलीस महानिरीक्षक, नागपूर परीक्षेत्र, नागपूर सुधार प्रन्यास, महानगरपालिका, जिल्हाधिकारी, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), महावितरण विभाग, विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था, कामगार आयुक्त कार्यालय, भूमी अभिलेख कार्यालय, जिल्हा परिषद, तसेच इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
****

No comments:

Post a Comment