नागपूर दि. 09 : आदिवासी क्षेत्रातील विद्यार्थ्यांना
शैक्षणिक सत्र 2018-19 करिता शासकीय वसतीगृहात प्रवेश देण्यासाठी आदिवासी विकास
विभागाच्या वतीने वेळापत्रक घोषित करण्यात आले आहे. विविध पाठ्यक्रमांना प्रवेश
घेतलेले विद्यार्थी दिनांक 30 ऑगस्टपर्यंत टप्प्या-टप्प्याने अर्ज सादर करु शकतील.
इयत्ता 8वी ते
10वी तसेच 11वी व 12वी चे विद्यार्थी दिनांक 20 जुलैपर्यत अर्ज सादर करु शकतील. गुणवत्तेच्या
आधारवर निवड चाचणी दिनांक 21 जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. तसेच दिनांक 25
जुलैपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करावा लागेल. पदवी पाठ्यक्रमाकरिता
दिनांक 25 जुलैपर्यंत अर्ज स्वीकृती, दिनांक 26 जुलै रोजी यादी प्रसिद्धी, दिनांक
30 जुलैपर्यंत प्रवेश निश्चिती. पदव्युत्तर पदवी पाठ्यक्रमाकरिता दिनांक 30
जुलैपर्यंत अर्ज स्वीकृती, दिनांक 31 जुलै रोजी यादी प्रसिद्धी, दिनांक 4 ऑगस्टपर्यंत
प्रवेश निश्चिती. पदविका पाठ्यक्रमाकरिता दिनांक 16 ऑगस्टपर्यंत अर्ज स्वीकृती,
दिनांक 17 ऑगस्ट रोजी यादी प्रसिद्धी, दिनांक 20 ऑगस्टपर्यंत प्रवेश निश्चिती तसेच
व्यावसायिक अभ्यासक्रमाकरिता दिनांक 30 ऑगस्टपर्यंत अर्ज स्वीकृती, दिनांक 1
सप्टेंबर रोजी यादी प्रसिद्धी, दिनांक 4 सप्टेंबरपर्यंत प्रवेश निश्चिती करावी
लागेल.
विद्यार्थ्यांनी
आदिवासी विकास विभागाच्या http://swayam.mahaonline.gov.in
या
संकेतस्थळाला भेट देऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी
अर्ज सादर करण्याचे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी डिगांबर चव्हाण
यांनी केले आहे.
*****
No comments:
Post a Comment