Friday, 27 July 2018

दिलखुलास कार्यक्रमात श्राव्य लोकराज्य



‘एकच लक्ष्य 13 कोटी वृक्ष’
मुंबई, दि. 27 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जुलै महिन्यात प्रसिद्ध झालेला एकच लक्ष्य 13 कोटी वृक्ष या लोकराज्य अंकातील लेख श्राव्य लोकराज्य या स्वरूपात दिलखुलास कार्यक्रमात प्रसारित होणार आहेत. आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवरून शनिवार दि. 28 आणि सोमवार दि. 30 जुलै रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत या श्राव्य स्वरूपातील लेखांचे प्रसारण होणार आहे. निवेदक राजेश राऊत यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले आहे.
लोकराज्य अंकात महाराष्ट्र बांबू विकास मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक टी.एस.के. रेड्डी लिखित बहुगुणी बहुपर्यायीहे लेख तसेच पथदर्शी महाराष्ट्रलक्ष्यपूर्ती दिशा’, या लेखांत महाराष्ट्रातील वृक्षांचे प्रमाण वाढविणे,बहुपयोगी बांबू वृक्षाची लागवड करणे, त्यापासून रोजगार निर्मिती,वन विभागाची कांदळवन संरक्षण आणि उपजिविका योजनेपासून उपजिविकेच्या साधनांचे निर्माण करणे या विषयांची माहिती देण्यात येणार आहे.
0 0 0

No comments:

Post a Comment