Sunday, 8 July 2018

ज्ञानेश्वर माऊली पालखीचे मुख्यमंत्र्यांनी घेतले दर्शन

    पुणे,दि.8: महाराष्ट्रातील अनेक वर्षांच्या आषाढी वारी परंपरेच्या औचित्यानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज भवानी पेठ येथे ज्ञानेश्वर माऊली पालखीच्या पादुकेचे दर्शन घेतले. यावेळी खासदार अमित शहा यांनीही दर्शन घेतले. त्यांच्या समवेत खासदार रावसाहेब दानवेपुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांच्याशिवाय भवानी पेठ पालखी विठोबा मंदिर देवस्थानचे अध्यक्ष तेजेंद्र कोंढरेगोरख भिकुलेप्रमोद बेंगरूटरत्नाकर हरिश्चंद्रेस्थानिक नगरसेविका श्रीमती सुलोचनाताई कोंढरे आदी उपस्थित होते.


*****

No comments:

Post a Comment