Sunday, 8 July 2018

संत विचारांचा ठेवा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविण्याची आवश्यकता - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे दि8महाराष्ट्राच्या समाजमनावर आजही संत विचारांचा मोठा पगडा आहेसामान्य माणसाला संत परंपरेच्या विचारानेच कायम प्रेरित केलेसंत विचार हे कालसापेक्ष असून हा विचारांचा ठेवा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रत्येक काळात संत चरित्रांचे लेखन होण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.
श्री गंधर्व वेद प्रकाशनच्या संतदर्शन चरित्र ग्रंथ चे प्रकाशन मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होतेयावेळी श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर संमितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकरचैतन्य महाराज देगलूरकरसंत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विदुरा नवलेसंत परंपरेचे अभ्यासक तथा ग्रंथाचे संपादक डॉसदानंद मोरे,आळंदी संस्थानचे विश्वस्त अभय टिळकप्रकाशक दीपक खाडिलकरप्रकाश खाडिलकर उपस्थित होते.


            संत विचार हे कालसापेक्ष आहेत, असे सांगून मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, प्रत्येक काळात त्यांच्या विचारांना महत्व आहेमहाराष्ट्राला संत विचारांची मोठी परंपरा आहे. संत विचाराने सामान्य माणसाला कायमच प्रेरणा दिलीसंत ज्ञानेश्वरांनी अखिल विश्वाच्या कल्याण चिंतण्याची परंपरा सुरू केली तर संत तुकारामांनी अध्यात्म आणि संसार यांची सुयोग्य सांगड घालून दिली.
ते पुढे म्हणाले की, संत विचार पुढच्या पिढी पर्यंत पोहोचण्यासाठी काळानुसार संत चरित्रांचे लेखन होण्याची आवश्यकता आहेसंत दर्शन’ या चरित्र लेखनाने संतांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचण्यास मदत होईलसामान्य लोकांपर्यंत संत विचार पोहोचावेत यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करण्यात येतील, असे श्रीफडणवीस यांनी सांगितले.  
गहिनीनाथ महाराज औसेकर म्हणालेप्रत्येक संतांच्या मागे मोठा इतिहास आहेहा संतांचा  इतिहास आजच्या पिढीसमोर येण्याची आवश्यकता आहेसंतांच्या विचारावरच चांगला समाज घडू शकतो.
चैतन्य महाराज देगलूरकर म्हणालेमहाराष्ट्र ही संतभूमी आहेनामदेवराय यांनी आपल्या अभंगातून सर्व संतांचे चरित्र पहिल्यांदा मांडलेसकल समाजाच्या उत्थानासाठी संतांचा जन्म झालासमाजाच्या बदलत्या मानसिकतेमुळे संत चरित्रांची वारंवार नव्याने मांडणी आवश्यक आहेतत्वज्ञान आणि आचरण यांचा सुयोग्य समन्वय संतांच्या जीवनात असल्याने त्यांची चरित्र कायमच उपयुक्त असतातजीवनाला दिशा देण्यासाठी संत चरित्रांची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.    
 डॉसदानंद मोरे म्हणालेमहाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची समृध्द परंपरा आहेसंतांनी महाराष्ट्राची साहित्य संस्कृती टिकवलीमहाराष्ट्राचा सामाजिक पोत सांभाळण्याचे काम संतांनी केलेसंतांचे विचार लोकांपर्यंत पोहोचावे यासाठी या संत चरित्राची निर्मिती करण्यात आली आहेवारकरी संप्रदायाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आस्था आहेती त्यांच्या कृतीतून वारंवार स्पष्ट होत असल्याचे त्यांनी सांगितले.  
कार्यक्रमाच्या सुरूवातीला ग्रंथाच्या सर्व लेखकांचा परिचय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करून घेतला व त्यांच्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्याप्रास्ताविक दीपक खाडिलकर यांनी केले.  सूत्रसंचलन दीपक खाडिलकर यांनी केलेपसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.


*****

No comments:

Post a Comment