Monday, 27 August 2018

सप्टेंबर महिन्याचे निवृत्तवेतन होणार 5 तारखेपर्यंत

नागपूर, दि.27 निवृत्तीवेतनधारकाचे सप्टेंबर महिन्याचे निवृत्तीवेतन दिनांक 5 सप्टेंबरपर्यंत संबधित बॅंकेमार्फत करण्यात येईल.
दि. 13 ऑगस्टच्या शासन निर्णयानुसार महागाई वाढीचा दर 132 टक्क्यावरून 136 टक्के व 136 टक्क्यावरुन 139 टक्के करण्यात आला आहे. या महागाई वाढीची थकबाकी ऑगस्टच्या देय होणाऱ्या निवृत्तीवेतनाच्या प्रदानासोबत करावयाचे असल्याने व निवृत्ती वेतन प्रणालीतील तांत्रीक अडचणीमुळे सप्टेंबरचे वेतन दि. 5 सप्टेंबरपर्यंत होईल, असे वरिष्ठ कोषागार कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
***** 

No comments:

Post a Comment