मुंबई.दि.3 : माहिती व
जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित 'दिलखुलास' कार्यक्रमात शेतक-यांच्या आर्थिक प्रगतीसाठी घेतलेले निर्णय या विषयावर सहकार मंत्री सुभाष
देशमुख यांची मुलाखत आकाशवाणीच्या अस्मिता
वाहिनीवरून शनिवार,
दि. 4 आणि सोमवार दि. 6 ऑगस्ट रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत पत्रकार सुरेश ठमके यांनी घेतली आहे.
केंद्र
शासनातर्फे पिकांना उत्पादन खर्चाच्या दिडपट किमान आधारभूत किंमत (हमी भाव)
देण्याचा महत्वपूर्ण निर्णय व त्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेली पिके, प्रत्यक्षात
शेतकऱ्यांना मिळणाऱ्या भावासंबंधीचे
धोरणात्मक निर्णय,
ऑनलाइन पद्धतीने शेतीमालाची खरेदी, राज्य शासनाने खरेदी केलेल्या
तुरीचा विनियोग, हंगाम 2017-18 एमएसपी ऑपरेशन, शेतमालाचे भाव स्थिर राहण्यासाठी केलेल्या उपाययोजना,बाजार
समित्यांचे ऑनलाईन कामकाज व त्यामध्ये शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार या विषयांची
माहिती श्री. देशमुख दिलखुलास कार्यक्रमातून देणार
आहेत.
0000

No comments:
Post a Comment