नागपूर, दि. 24 : केंद्रीय भूपृष्ठ परिवहन, जहाजबांधणी, जलसंधारण, गंगा शुद्धीकरण मंत्री नितीन गडकरी यांचे शनिवार, दिनांक 25 ऑगस्ट रोजी सकाळी 7.40 वाजता मुंबई येथून नागपूर विमानतळावर आगमन.
सकाळी 8 वाजता रामनगर निवासस्थानी आगमन व राखीव. सकाळी 10 वाजता अभ्यागतांशी भेटी. दुपारी 12 वाजता एसीए सायंटिफिक रिसर्च एन्ड ट्रेडिंग प्रा. ली. चे संचालक विमल खंडेलवाल यांच्याशी चर्चा. दुपारी 1 वाजता रामनगर येथे स्त्री शिक्षण प्रसारक मंडळाच्या आदिवासी विद्यार्थिनीचा रक्षाबंधन कार्यक्रम. सायंकाळी 5.30 वाजता सुरेश भट सभागृह, रेशीमबाग येथे माजी पंतप्रधान स्व. अटल बिहारी वाजपेयी यांच्या श्रद्धांजली सभेला उपस्थिती व रात्री मुक्काम.
रविवार, दिनांक 26 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता रामगिरी येथे नागपूर शहर विकास कामांबाबत बैठक. सायंकाळी 5.30 वाजता देशपांडे सभागृह, सिव्हील लाईन येथे स्व. उमेशजी चौबे यांच्या श्रद्धांजली सभेला उपस्थिती व रात्री मुक्काम.
*****
No comments:
Post a Comment