नागपूर, दि. 24 : शेतकऱ्यांकरिता केलेल्या भरीव कामगिरीचे स्मरण व्हावे व राज्यातील शेतकऱ्यांचा सन्मान करण्यासाठी पद्मश्री डॉ. विट्ठलराव विखे पाटील यांचा जन्मदिन 25 ऑगस्ट हा दिवस राज्यात ‘शेतकरी दिन’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त जिल्ह्यात कृषी विभागाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
‘शेतकरी दिनी’ शासनाच्या विविध योजना, अभियान, उपक्रम याविषयीची माहिती देण्यासह शेतकऱ्यांना शासकीय योजनांशी जोडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. जिल्हास्तरावर जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, प्रकल्प संचालक (आत्मा) व कृषी विकास अधिकारी, तालुकास्तरावर तालुका कृषी अधिकारी, गट विकास अधिकारी यांच्या सहकार्याने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
*****
No comments:
Post a Comment