मुंबई, दि. ६: माहिती व
जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित 'दिलखुलास' कार्यक्रमात पीक पेऱ्याचे अचूक संकलन करण्यासाठी कृषी विभागाने निर्गमित
केलेल्या अधिसुचनेबाबत राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांची मुलाखत घेण्यात आली आहे. ही
मुलाखत आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवरून मंगळवार दि. ७ आणि बुधवार दि. ८ ऑगस्ट
रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे. पत्रकार सुरेश ठमके यांनी
ही मुलाखत घेतली आहे.
पेरणीचे अचूक नियोजन व पेरणी झाल्यानंतर पीक
पेऱ्याचे संकलन, शेतक-यांनी केलेल्या पेरणीची अचूक नोंद गाव
नमुना व नमुना १२ वर करण्याच्या सूचना, पेरलेल्या पीकांचा
प्रकार व आंतरपीकांची अचूक नोंद, पेरणीचे सूक्ष्म नियोजन व अचूक संकलन, शेतक-यांना
योग्य दर मिळण्यासाठी पीक पे-याचा वापर, नोंदणी करण्यात
येणारी पीके तसेच शेतक-यांना पीक
पे-याच्या अचूक नोंदणीसंदर्भात जागरूक करण्याबाबतची माहिती श्री. पटेल यांनी
दिलखुलास कार्यक्रमातून दिली आहे.
000

No comments:
Post a Comment