Saturday, 4 August 2018

सात जिल्ह्यातील रोजगार संधींचे अर्थमंत्र्यांसमोर सादरीकरण

मुंबई दि. 4:   राज्यातील सात जिल्ह्यांच्या नैसर्गिक विकासाच्या क्षमता आणि तिथे असलेल्या आणि निर्माण करता येऊ शकतील अशा रोजगार संधींचा शोध घेण्यासाठी केपीएमजी आणि पीडब्ल्युसी या दोन कंपन्यांना नियुक्त करण्यात आले होते त्यांनी काल अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासमोर सादरीकरण केले.
सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या या बैठकीस कौशल्य विकास विभागाचे सचिव असीम गुप्ता यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
निवडण्यात आलेल्या सात जिल्ह्यांमध्ये चंद्रपूरभंडारागोंदियावर्धायवतमाळनागपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश आहे. मॅग्नेटिक महाराष्ट्र उपक्रमांतर्गत या सात जिल्ह्यात गुंतवणूक वाढवतांना येथे व्यापक रोजगार संधी निर्माण करणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट असल्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले. स्थानिक पातळीवर रोजगार निर्माण करतांना ते पर्यावरणस्नेहीभौगोलिक गरजांची पर्तता करणारे आणि स्थानिकांच्या उत्पन्नात वाढ करणारे रोजगार असावेतत्यादृष्टीनेही या सर्वेक्षणात अभ्यास केला जावा असेही त्यांनी यावेळी सांगितले. या दोन संस्थांनी सादर केलेल्या सर्वेक्षणानंतर उत्तम रोजगार जे प्रत्यक्षात कार्यान्वीत होऊन स्थानिकांना अधिक लाभदायकरोजगारक्षम ठरू शकतील अशा उद्योग- व्यवसायाच्या स्थापनेसाठी दिशादर्शक नियोजन करून ते प्रत्यक्षात अंमलात आणले जाणार आहे.
या दोन संस्थांनी सात जिल्ह्यातील नैसर्गिक आणि भौगोलिक परिस्थितीसध्या तिथे असलेले रोजगारत्यांचे स्वरूप आणि भविष्यातील विकासाच्या वाटात्यातून निर्माण होणारे रोजगार याचा अभ्यास केला आहे.  या सात शहरात कृषीपणनवनकृषी प्रक्रिया केंद्रपशुसंवर्धन- दुग्ध व्यवसायमत्स्य व्यवसाय,  पर्यटनवनोपजमाहिती तंत्रज्ञाननिसर्ग पर्यटन यासह इतर सर्व संबंधित क्षेत्रातील रोजगारांचे सादरीकरण झाले. स्थानिकांना प्रशिक्षण देऊन त्यांच्या उत्पादनांचा गुणात्मक विकासपणन व्यवस्थेची साखळी विकसित करणेउत्पादन प्रक्रिया राबवितांना त्यात स्वच्छता आणि गतिमानता आणणे,  या रोजगार संधीच्या निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांची निर्मिती करणे,  शासनाच्या विविध योजनांच्या समन्वयातून योजनांच्या अंमलबजावणीला गती देणेया दृष्टीकोनातून करावयाच्या नियोजनबद्ध प्रयत्नांवरही आजच्या सादीकरणादरम्यान चर्चा झाली.
0 0 0

No comments:

Post a Comment