Monday, 6 August 2018

'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात सहकार मंत्री सुभाष देशमुख


             मुंबई.दि.६: माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमातसहकार,पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांची मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून मंगळवार दि. ७ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ७.३० ते ८.०० या वेळेत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत पत्रकार सुरेश ठमके यांनी  घेतली आहे.
            केंद्र शासनातर्फे पिकांना उत्पादन खर्चाच्या दिडपट किमान आधारभूत किंमत (हमी भाव) देण्याचा महत्वपूर्ण निर्णय व त्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेली पिक, प्रत्यक्षात शेतकऱ्यांना मिळणाऱ्या किंमतीसाठीचे धोरणात्मक निर्णय,ऑनलाइन पद्धतीने शेतीमालाची  खरेदी,राज्य शासनाने खरेदी केलेल्या तुरीचा विनीयोगहंगाम २०१७ -१८ एमएसपी ऑपरेशन, शेतमालाचे भाव स्थिर राहण्यासाठी केलेल्या उपाययोजना, बाजार समित्यांचे ऑनलाईन कामकाज व त्यामध्ये शेतक-यांना मतदानाचा अधिकार या विषयांची माहिती श्री. देशमुख यांनी 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमातून दिली आहे.
*****

No comments:

Post a Comment