नागपूर, दि.26 : माजी
पंतप्रधान स्व. अटल बिहारी वाजपेयी यांच्या अस्थिंचे कामठी येथील कन्हान नदीवरील महादेव घाट येथे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे
यांच्या उपस्थितीत विसर्जन करण्यात आले.
यावेळी
महापौर नंदाताई जिचकार, जिल्हा परिषद अध्यक्षा निशताई सावरकर, खासदार कृपाल तुमाने,
सर्वश्री आमदार प्रा. अनिल सोले, गिरीष व्यास, डॉ. मिलिंद माने, सुधाकर देशमुख,
उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती सभापती विक्की कुकरेजा, डॉ. राजीव पोतदार,
माजी आमदार आशिष जैस्वाल यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
आज
सकाळी कोराडी येथून निघालेल्या अस्थिकलश पदयात्रेत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे
सहभागी झाले. पु्ढे कामठी येथील जयस्तंभ चौक येथून ही पदयात्रा महादेव घाट येथे
आली. यावेळी उपस्थित नागरिकांनी अस्थिकलशाचे दर्शन घेतले. त्यानंतर मंत्रजपाच्या घोषात
तसेच स्व. अटल बिहारी वाजपेयी अमर रहे, जब तक सूरज चाँद रहेगा, अटलजी आपका नाम
रहेगा’ घोषणांच्या निनादात अस्थींचे
विसर्जन करण्यात आले.
****
No comments:
Post a Comment