Thursday, 2 August 2018

माजी सैनिकांच्या पाल्यांकडून शिष्यवृत्तीसाठी अर्ज आमंत्रित


 नागपूर,दि.2 : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून शैक्षणिक वर्ष 2018-19 साठी कल्याणकारी निधीतून माजी सैनिक - विधवांच्या पाल्यांसाठी  दहावी, बारावी तसेच पदवी शिष्यवृत्ती देण्यात येत आहे.  इच्छुक उमेदवारांनी  15 ऑक्टोबर 2018 पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी तथा माजी कॅप्टन दीपक लिमसे यांनी केले आहे.
 माजी सैनिक तसेच विधवांच्या पाल्यांना दहावी, बारावी आणि पदवी परीक्षेमध्ये 60 टक्के गुण असणे अनिवार्य आहे.  गरजूंनी कार्यालयात  उपलब्ध असलेल्या विहित अर्ज नमुन्यात सादर करावा. ओळखपत्राची छायांकित पत्र, सध्या पाल्य शिक्षण घेत असलेल्या  वर्गाचे बोनाफाईड प्रमाणपत्र, उत्तीर्ण  गुणपत्रिकेची सत्यपत्र, पाल्यास कोणत्या योजनेंतर्गत शिष्यवृत्ती मिळत नसल्याचे प्रमाणपत्र, आर्थिक मदतीच्या कार्डची झेरॉक्स व बँक पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स प्रती सादर करणे आवश्यक आहे.
ज्या माजी सैनिकांच्या पाल्यांनी अभियांत्रिकी, वैद्यकीय, आणि व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी पंतप्रधान शिष्यवृत्ती योजने अंतर्गत केंद्रीय सैनिक बोर्ड नवी दिल्ली यांच्याकडे ऑनलाईन अर्ज केला असेल असे पाल्य शिष्यवृत्तीस पात्र राहणार नाहीत. तसेच अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिकी कल्याण कार्यालय नागपूर येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी  माजी कॅप्टन  दीपक लिमसे यांनी केले आहे.
***

No comments:

Post a Comment