नागपूर, दि.2 :माजी सैनिक व विधवा पाल्यांनी शैक्षणिक वर्ष 2018-19 मध्ये इयत्ता 12 वीमध्ये 60 टक्यापेक्षा
जास्त गुण घेऊन उत्तीर्ण झालेल्या आणि मेडीकल, तांत्रिक, मॅनेजमेंट, अभ्यासक्रमास व इतर व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्यांनी नविन
पंतप्रधान शिष्यवृत्तीसाठी अर्ज केंद्रीय सैनिक बोर्ड नवी दिल्ली, येथे 15 नोव्हेंबर 2018 पर्यंत सादर करावे.
तसेच इच्छुक उमेदवारांनी www.ksb.gov.in या संकेतस्थळावर अर्ज भरावा. 15 नोव्हेंबरनंतर आलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत. या
योजने अंतर्गत माजी सैनिकांच्या मुलास दरमहा 2 हजार व मुलीस 2 हजार 250 रुपये शिष्यवृत्ती देण्याची तरतूद आहे. संबंधीत
कागदपत्रे व नमुने जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात उपलब्ध आहे. इच्छुक व पात्र
माजी सैनिक व विधवांच्या पाल्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन माजी कॅप्टन दीपक लिमसे यांनी केले आहे.
*****
No comments:
Post a Comment