Monday, 26 November 2018

26/11 दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना राज्यपाल व मुख्यमंत्र्यांनी केले अभिवादन



मुंबईदि. 26 : मुंबईत 26 नोव्हेंबर 2008 रोजी  दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना मरीन लाईन्स पोलीस जिमखाना येथील शहीद स्मृतिस्थळाला राज्यपाल चे.विद्यासागर राव व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी शिक्षणमंत्री विनोद तावडेपदुम मंत्री महादेव जानकरगृहराज्यमंत्री (शहरे) डॉ. रणजित पाटीलगृहराज्यमंत्री (ग्रामीण) दीपक केसरकरसर्वश्री आमदार अॅड. आशिष शेलारराज पुरोहितभाई जगतापअमीन पटेलमुख्य सचिव दिनेश कुमार जैनगृह विभागाचे अपर मुख्य सचिव सुनील पोरवालपोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकरमुंबईचे पोलीस आयुक्त सुबोध कुमार जैस्वालअमेरिकेचे राजदूत केनिथ जस्टरएनएसजी कमांडो हेमंत साहनीशहीद अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील सदस्य यांनीही पुष्प अर्पण करून शहिदांना अभिवादन केले.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पेंटिंग इंस्टॉलेशनचे अनावरण
कोकुयो कॅम्लिन लिमिटेडतर्फे 26/11 चा थरार चित्ररूपात मांडला आहे. या पेंटिंग इंस्टॉलेशनचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी पेंटिंगची पाहणी करुन
कौतुक केले.
000

No comments:

Post a Comment