मुंबई, दि. 25 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे, व डॉ.बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 26 नोव्हेंबर, 2018 ते दि. 2 डिसेंबर, 2018 या कालावधीत ‘संविधान सप्ताह’निमित्ताने राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
संविधान सप्ताहामध्ये राज्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळेतील व महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी होऊन संविधानाच्या उद्देशिकेचे समूह वाचन करतील. या सप्ताहामध्ये संविधानावर आधारित निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, पथनाट्य, प्रश्नमंजुषा , चित्ररथ, संविधान प्रतींचे वाटप, संविधान जलसा, दिव्यांग कला सादरीकरण, ‘भारतीय संविधान’ आधारित प्रबोधन कार्यक्रम, ‘संविधानातील मूलभूत हक्क’ यांचे वाचन,चर्चासत्र आदी कार्यक्रम राबविले जातील. या संविधान सप्ताहानिमित्त प्रत्येक जिल्ह्यात समाजकल्याण कार्यालय व जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने चर्चासत्राचे आयोजन करण्यात येणार आहे.
0000
No comments:
Post a Comment