सातारा, दि.25 : महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृती दिनानिमित्त कराड येथील प्रीतिसंगम समाधी स्थळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. महाराष्ट्राच्या निर्मितीत यशवंतराव चव्हाणांचा मोठा वाटा आहे. राज्याच्या प्रगतीकरिता त्यांनी पाया रचला अशा या नेत्यास अभिवादन करण्यासाठी आपण प्रीतिसंगमावर दरवर्षी येतो, अशा भावना मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केल्या.
यावेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, सहकारमंत्री सुभाष देशमुख, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, पंढरपूरच्या विठ्ठल मंदिर देवस्थान समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले, आ. शंभुराज देसाई, आ. विश्वजीत कदम, कराडच्या नगराध्यक्ष रोहिणी शिंदे, जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे, जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनीही प्रीतिसंगम समाधीस्थळावर आदरांजली वाहिली.
0000



No comments:
Post a Comment