Monday, 26 November 2018

आश्रमशाळा शिक्षक, शिक्षकेत्तर अंशदान निवृत्तीवेतनाबाबत नवीन लेखाशिर्ष उपलब्ध करण्याची कार्यवाही सुरु - प्रा. राम शिंदेआश्रमशाळा शिक्षक, शिक्षकेत्तर अंशदान निवृत्तीवेतनाबाबत नवीन लेखाशिर्ष उपलब्ध करण्याची कार्यवाही सुरु - प्रा. राम शिंदे

मुंबईदि. 26 : विमुक्त जातीभटक्या जमातीइतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग आश्रमशाळा शिक्षकशिक्षकेत्तर अंशदान निवृत्तीवेतनाबाबत नवीन लेखाशिर्ष उपलब्ध करण्याची कार्यवाही सुरु असल्याचे विमुक्त जातीभटक्या जमातीइतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग मंत्री प्रा. राम शिंदे यांनी सांगितले.
याबाबतची लक्षवेधी सदस्य सर्वश्री दत्तात्रय सावंतविक्रम काळेहरिभाऊ राठोड यांनी मांडली होती.
यावेळी प्रा. शिंदे म्हणालेविमुक्त जातीभटक्या जमातीइतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग विभागाने मान्यता दिलेल्या व 100 टक्के अनुदानित आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आलेल्या परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजनेसाठी द्यावयाचे नियोक्त्याचे समतुल्य अंशदान तसेच कर्मचाऱ्याचे व नियोक्त्याचे जमा होणारे अंशदानावर व्याज देण्यासाठी तरतूद करण्याच्या अनुषंगाने नवीन लेखाशिर्ष उपलब्ध करुन घेण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.
००००

No comments:

Post a Comment