Monday, 26 November 2018

शिक्षक पात्रता परीक्षेबाबतचा (टी.ई.टी.) निर्णय कायदेशीर बाबी तपासून घेतला जाईल - विनोद तावडे

मुंबईदि. 26 : राज्यातील सर्व प्राथमिक शाळांतील शिक्षक पदावरील नियुक्तीकरीता शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता निश्चित करुन शिक्षक पात्रता परीक्षा बंधनकारक केली आहे. याबाबतचा पुढील निर्णय कायदेशीर बाबी तपासून घेतला जाईलअसे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सांगितले.
याबाबतची लक्षवेधी सदस्य सर्वश्री दत्तात्रय सावंतविक्रम काळेनागो गाणारहरिभाऊ राठोड यांनी मांडली होती. त्यावेळी श्री. तावडे बोलत होते.
यावेळी श्री. तावडे म्हणालेराज्यात शिक्षक पात्रता परीक्षा पात्र असलेले उमेदवार उपलब्ध असताना त्यांची नियुक्ती न करता सेवेत असलेल्या शिक्षकांना सदर पात्रता परीक्षा पात्र होण्यास मुदतवाढ दिल्याच्या कारणास्तव उच्च न्यायालयखंडपीठ औरंगाबाद येथे याचिका दाखल आहे. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ठ आहे.
००००

No comments:

Post a Comment