Tuesday, 27 November 2018

विभागीय स्तरावर चौकशी करून कारवाई – शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे


मुंबई, दि. 27 : दहिसर मुंबई उपनगरातील रुस्तमजी टुपर्स स्कूल या शाळेची नियमबाह्य शुल्क आकारणी प्रकरणी महानगरपालिका स्तरावर चैाकशी करण्यात आली आहे. या शाळेची आता विभागीय स्तरावर चैाकशी करून चौकशीअंती योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधानपरिषदेत सांगितले.
विधानपरिषद सदस्य विलास पोतनीस यांनी रुस्तमजी ट्रुपर्स स्कूल या शाळेची नियमबाह्य शुल्क आकारणीविषयीची लक्षवेधी विधानपरिषदेत उपस्थित केली होती. यावर उत्तर देताना श्री. तावडे बोलत होते.
रुस्तमजी टुपर्स स्कूल ही मनपा मान्याताप्राप्त इंग्रजी माध्यमाची विना अनुदानित शाळा आहे. चालू शैक्षणिक वर्षात या शाळेने केलेल्या शुल्कवाढीसंदर्भात काही विद्यार्थ्यांच्या पालकांनी महानगरपालिकेकडे तक्रारी दाखल केल्या होत्या या तक्रारीच्या अनुषंगाने मनपा शिक्षण विभागाच्या संबंधित अधीक्षक (शाळा) व विभाग निरीक्षक (शाळा) यांनी शाळेला भेट देऊन पडताळणी केली आहे. आता या शाळेची विभागीय स्तरावर चैाकशी करून  चौकशीअंती योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचे श्री. तावडे यांनी सांगितले.
000

No comments:

Post a Comment