मुंबई, दि. 27 : राज्यातील मान्यताप्राप्त
खाजगी, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील कार्यरत
शिक्षकांच्या सेवाज्येष्ठतेबाबत न्यायालयाच्या निर्देशानुसार कार्यवाही करण्यात
येईल. यासाठी विधी विभागाचे तसेच विधान परिषदेतील शिक्षक सदस्यांची मते जाणून
घेण्यात येतील, असे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी
विधानपरिषदेत सांगितले.
विधानपरिषद नियम 92 अन्वये सदस्य नागोराव गाणार
यांनी राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी, माध्यमिक व
उच्च माध्यमिक शाळांमधील कार्यरत शिक्षकांच्या सेवाज्येष्ठतेबाबत उपस्थित केलेल्या
चर्चेला उत्तर देताना श्री. तावडे बोलत होते. राज्यातील मान्यताप्राप्त खासगी,
माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील कार्यरत शिक्षकांच्या सेवाज्येष्ठतेविषयीच्या
अनेक याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. त्यामुळे न्यायालयाच्या निर्देशानुसार
सेवाज्येष्ठतेबाबत निर्णय घेण्यात येईल, असे श्री. तावडे
यावेळी म्हणाले.
यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य विक्रम काळे
यांनी भाग घेतला.
0000
No comments:
Post a Comment