* मिनिस्ट्री ऑफ फूड प्रोसिसिंग इंडस्ट्री आणि डिक्की
नागपूर, दि. 26 : मिनिस्ट्री ऑफ फूड प्रोसिसिंग इंडस्ट्री व दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स (डिक्की)च्या वतीने अन्न प्रक्रिया उद्योगावरील विविध जनजागृती कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी दिनांक 27 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 ते 5 या दरम्यान बानाई हॉल, उर्वेला कॉलनी, वर्धा रोड, नागपूर येथे परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.
परिसंवादाचा शुभारंभ केंद्रीय मिनिस्ट्री ऑफ ड्रिंकिंग वॉटरच्या सहसचिव व्हि. राधा, बँक ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक अतानू दास, कृषी आणि प्रक्रियाकृत खाद्य उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणाचे सहायक महाव्यवस्थापक नागपाल लोहकरे, अन्न व औषधी प्रशासनाचे सहआयुक्त शशिकांत केकरे, बँक ऑफ बरोडाचे महाव्यवस्थापक राकेश कुमार, बँक ऑफ इंडियाचे महाव्यवस्थापक विलास पराते, सहायक महाव्यवस्थापक श्री. अग्रवाल, लीड बँक व्यवस्थापक शरद बारापात्रे, मिनिस्ट्री ऑफ फूड प्रोसिसिंग इंडस्ट्री दिल्ली येथील वरिष्ठ अधिकारी आदी उपस्थित राहणार आहेत.
मिनिस्ट्री ऑफ फूड प्रोसिसिंग इंडस्ट्री, भारत सरकार तर्फे अन्न प्रक्रिया उद्योगातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या सक्षमीकरणासाठी 100 दिवसीय आउटरिच कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत अन्न प्रक्रिया उद्योगाच्या स्थापनेसाठी उपयोगी विविध उपक्रमांचे आयोजन देशातील 100 जिल्ह्यात करण्यात आले असून नागपूर जिल्ह्याचाही त्यात समावेश आहे.
नागपूर जिल्ह्यात अन्न प्रक्रिया उद्योग स्थापनेसाठी युवक-युवतींना, उद्योजकांना प्रोत्साहित करणे, त्यांना सहजपणे उद्योग स्थापनेसाठी अर्थसहाय उपलब्ध करून देणे, अन्न प्रक्रिया उद्योग स्थापनेसाठी आवश्यक विविध कायदेशीर बाबींची ओळख करून देणे, अन्न सुरक्षा कायदे विषयी माहिती देणे या उद्देशाने परिसंवादाचे आयोजन करण्यात आले असल्याचे डिक्की वेस्ट इंडियाचे अध्यक्ष निश्चय शेळके आणि डिक्की विदर्भचे अध्यक्ष गोपाल वासनिक यांनी सांगितले.
*****
No comments:
Post a Comment