नागपूर, दि.25 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, दिनांक 26 नोव्हेंबर रोजी सकाळी 8वाजता दिक्षाभूमी मार्ग शासकीय आय.टी.आय समोर सामाजिक न्याय भवन येथून ‘संविधान गौरव रैली’चे आयोजन करण्यात आले आहे.
‘भारतीय संविधान संस्कृती, विविधतेत एकता’ या विषयावर आधारित गौरव रैली स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विजेत्यांना बक्षीसे देखील देण्यात येणार आहे. याशिवाय दैनंदिन कार्यक्रमांमध्ये सायंकाळी6.30 वाजता भीमस्पंदन या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 27 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6.30 वाजता वक्तृत्व स्पर्धा, रात्री 8 वाजता ‘रमाई’ नाटक, दिनांक 28 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6.30 वाजता संविधान संध्या या प्रबोधनात्मक गितांचा कार्यक्रम व विविध शासकीय योजनांची माहिती व मार्गदर्शन कार्यक्रम, दिनांक 29 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6.30 वाजता प्रबोधनात्मक कार्यक्रम, दिनांक 30 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता दिव्यांग कला सादरीकरण, सायंकाळी 7 वाजता कविसंमेलन, दिनांक 1 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता पथनाट्य स्पर्धा व सायंकाळी 7 वाजता मुशायरा तसेच दिनांक 2 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांच्या उपस्थितीत समारोपीय कार्यक्रम व पारितोषिक वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. सर्व कार्यक्रम हे दिक्षाभूमी येथे घेण्यात येणार आहे. या कार्यक्रमांना जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
*****
No comments:
Post a Comment