Sunday, 25 November 2018

यंदा वृक्ष लागवडीमध्ये 4 कोटी बांबूची लागवड - सुधीर मुनगंटीवार




* 10व्या ॲग्रो व्हिजन अंतर्गत ‘बांबू लागवड आणि संधी’ परिषद
नागपूरदि.25 : ‘बांबू’ हे आधुनिक युगातील कल्पवृक्ष आहेशेतकऱ्यांसाठी सोने म्हणून गणल्या जाणाऱ्या बांबूची लागवड केल्यास अन्नवस्त्रनिवाराशिक्षणआरोग्य व रोजगार अशा मूलभूत गरजा एकाच कल्पवृक्षाच्या माध्यमातून पूर्ण करता येऊ शकतातत्यामुळे सन 2019 मध्ये राबविण्यात येणाऱ्या 33 कोटी वृक्ष लागवड अभियानांतर्गत शेतकऱ्यांच्या सहकार्याने राज्यात 4 कोटी बांबूची लागवड करण्यात येणार असल्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज सांगितले.
रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृह येथे 10व्या ॲग्रो व्हिजन महोत्सवांतर्गंत ‘बांबू लागवड आणि संधी’ या विषयावर परिषदेचे आयोजन करण्यात आलेत्यावेळी परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरीकेंद्रीय सूक्ष्मलघु व मध्यम उद्योगाचे राज्यमंत्री गिरीराज सिंगजिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती निशा सावरकरखासदार डॉविकास महात्मे,खासदार संजय धोत्रेबांबू लागवड व प्रक्रिया योजनेचे एमबीडीबी टीएसकेरेड्डीबांबू लागवड तसेच औद्योगिक विकासावर कार्य करणारे एफडीसीएम एन रामबाबूगिरीश गांधीरमेश मानकर आदी उपस्थित होते.
वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणालेबांबूच्या माध्यमातून रोजगार निर्मितीच्या महामार्गावर मार्गक्रमण करण्यासाठी या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहेमहाराष्ट्रात विशेष करुन विदर्भात बांबूच्या लागवडीवर विशेष भर देण्यात आला आहेचंद्रपूर येथे सुरु करण्यात आलेल्या बांबू रिसर्च अँन्ड ट्रेनिंग सेंटरची दखल सिंगापूरने घेतली आहेचंद्रपूर येथे सुरु करण्यात आलेल्या रिसर्च सेंटरची 30हजार फूट परिसरातील इमारत बांबूपासून तयार करण्यात येत आहेया इमारत निर्मितीच्या माध्यमातून येथे रोजगाराची साधने उपलब्ध होणार आहे.
अन्नवस्त्रनिवाराशिक्षणआरोग्य तसेच रोजगारासाठी उपयुक्त असणाऱ्या बांबूच्या लागवडीने राज्यात 1 लाख 20 हजार कोटीपेक्षा अधिकचा व्यवसाय होईलअशी अपेक्षा व्यक्त करीत मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणालेबांबू आधुनिक युगाचा कल्पवृक्ष व गरिबांचे सोने आहेया सोन्याचा मानवी जीवनात अधिकाधिक वापर कसा करता येईलयावर भर दिला जाणार आहेत्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनात विदर्भात बचत गटांच्या सहकार्याने बांबूपासून अगरबत्ती निर्मिती तसेच टुथपीक तयार करण्याचे उद्योग सुरु करण्यात येत आहेतत्यामुळे विदेशातून बांबूची आयात न करता आता अगरबत्तीसाठी बांबूच्या काड्या तसेच टुथपीकसाठी लागणारा बांबू विदर्भात उपलब्ध करुन दिला जाणार आहे.
बांबूच्या लागवड क्षेत्राविषयी बोलताना मंत्री मुनगंटीवार म्हणालेबांबू बोर्डाची स्थापना करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य आहेमागील दोन वर्षात देशाच्या 15 हजार चौरस किलोमीटर क्षेत्रापैकीहजार 465 चौरस किलोमीटर बांबूच्या क्षेत्रात वाढ झाली आहेदेशातील 31 राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात बांबू लागवड क्षेत्रात सर्वाधिक वाढ झाली आहेत्यामुळे येत्या काळात शेतकऱ्यांनी जास्तीत -जास्त बांबूची लागवड करावीयासाठी मनरेगा अंतर्गत शेतकऱ्यांना हेक्टरी 2 लाख 3 हजार रुपये अर्थसहाय्य दिले जाणार आहेयाशिवाय राज्याच्या 33 कोटी वृक्ष लागवड अभियानामध्ये राज्यात सन 2019मध्ये 4 कोटी बांबूच्या टिशू कल्चर रोपट्याची लागवड करण्यात येणार आहेबांबूची लागवड करण्यासोबतच त्याला बाजारपेठ उपलब्ध व्हावीयासाठी विविध कंपन्यांशी करार करण्यात आले आहेज्याद्वारे शेतकऱ्यांच्या उत्पादित बांबूला थेट बाजारपेठ उपलब्ध होईलअसा विश्वास वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.
  केंद्रीय सूक्ष्मलघु व मध्यम उद्योगाचे राज्यमंत्री गिरीराज सिंग यांनी बांबू लागवडीच्या क्षेत्रात महाराष्ट्रासह बिहार राज्यातही काम केले जात असल्याचे सांगताना म्हणालेबांबू ही संपदा शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहेमूलभूत गरजा भागविण्यासोबतच त्यापासून तयार करण्यात आलेल्या वस्तूची मागणी देशात वाढत आहेपरंतु बांबूची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध होत नसल्याने उत्पादनाला योग्य भाव मिळत नाहीत्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादनाबरोबर बांबूसाठी बाजारपेठ उपलब्ध करुन देण्याचा सल्ला देत या कार्यासाठी केंद्रीय सूक्ष्मलघु व मध्यम उद्योग मंत्रालय सहकार्य करेल,असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी बांबू लागवड आणि संधी याविषयावर प्रकाश टाकलात्यांनी ॲग्रो व्हिजन महोत्सवाच्या माध्यमातून बांबूच्या उत्पादनाची ओळख व्हावीयासाठी शासनाद्वारे करण्यात येणाऱ्या प्रयत्नांची माहिती दिली.
कार्यक्रमाचे संचलन श्रीमती रेणुका देशकर यांनी तर आभार प्रदर्शन सीडीमाळी यांनी मानले.
*****

No comments:

Post a Comment