नागपूर, दि 26 : विभागीय आयुक्त कार्यालयात आज संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी आयुक्त डॉ. संजीव कुमार यांच्या उपस्थितीत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन केले.
यावेळी उपायुक्त सुधाकर तेलंग, के.एन.के.राव, सुधीर शंभरकर, श्री राठी, सहाय्यक आयुक्त श्रीमती मनिषा जायभाये, श्रीमती वर्षा गौरकार, तहसिलदार रविंद्र माने, श्रीमती सुजाता गावंडे, अनिल निनावे, नितीन गौर यांच्यासह विभागीय आयुक्त कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment