Monday, 26 November 2018

संविधान दिनानिमित्त उद्देशिकेचे सामुहिक वाचन


जिल्हाधिकारी कार्यालयात संविधान दिनाचे आयोजन

नागपूरदि.26 : संविधान दिनानिमित्त जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्या उपस्थितीत भारताच्या संविधान उद्देशिकेचे सामुहिक वाचन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचत भवन सभागृहात करण्यात आले. यावेळी अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी आम्हीभारताचे लोकभारताचे एक सार्वभौमसमाजवादीधर्मनिरपेक्षलोकशाहीगणराज्य घडविण्यासोबतच सर्व नागरिकास सामाजिकआर्थिकराजनितीक न्याय असलेल्या संविधान उद्देशिकेच्या सामुहिक वाचनाने सुरुवात केली. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रकाश पाटीलनिवासी उपजिल्हाधिकारी रविंद्र खजांजीउपजिल्हाधिकारी रविंद्र कुंभारेअविनाश कातडेश्रीमती विजया बनकरश्रीमती गंधेजिल्हा पुरवठा अधिकारी भास्कर तायडेजिल्हा नियोजन अधिकारी मिलींद नारिंगे तसेच अधिकारी व कर्मचारी यांनी यावेळी संविधान उद्देशिकेचे सामुहिक वाचन केले.
*****

No comments:

Post a Comment