Tuesday, 27 November 2018

प्रशिक्षणार्थींची थेट मुलाखत आज


नागपूर, दि. 27 : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या वतीने अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत ब्युटीपार्लर, डिप्लोमा इन जीएसटी व संगणक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणाकरिता उद्या दिनांक 28 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता इच्छूक प्रशिक्षणार्थींची थेट मुलाखत घेण्यात येणार आहे.
आयटीआय च्या समोर महात्मा फुले मागासवर्ग महामंडळ, मर्यादित 301, बी-विंग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे थेट मुलाखती घेण्यात येतील. 18 ते 35 वर्षे वयोगटातील इच्छूक जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला (मर्यादा रु. 1 लक्ष), शिधा पत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला, किंवा जन्म दाखला, आधार कार्ड, विजेचे बील इत्यादी कागदपत्रासह उपस्थित राहू शकतो. 3 ते 4 महिने कालावधीकरिता प्रशिक्षण देण्यात येणार असून प्रशिक्षणार्थींना शासन नियमानुसार विद्यावेतन, प्रमाणपत्र देण्यात येईल. इच्छूकांची निवड ही समिती मार्फत करण्यात येणार असल्याने इच्छूक प्रशिक्षणार्थींनी मुळ प्रमाणपत्रांसह झेरॉक्स प्रति घेऊन मुलाखतीस उपस्थित राहण्याचे आवाहन महात्मा फुले मागासवर्ग महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक एस. जे. खोब्रागडे यांनी केले आहे.
***** 

No comments:

Post a Comment