Monday, 7 January 2019

हंगाम 2018-19 मध्ये हमी दराने कापसाची खरेदी सुरु · राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी निर्धारित दरानेच विक्री करण्याचे आवाहन


प्र. प. क्र.  35                                                    दिनांक 07 जानेवारी  2019
                        

       नागपूर, दि. 7  :  हंगाम 2018-19 मध्ये राज्य शासनाच्या शिफारसीप्रमाणे सीसीआय व सीसीआय चे सबएजंट म्हणून कापूस पणन  महासंघाद्वारे अनुक्रमे 65 व 42 केंद्रावर कापसाची हमी दराने खरेदी सुरु करण्यात आली आहे. राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र शासनाने निर्धारित केलेल्या हमी दरापेक्षा कमी दराने कापूस विक्री करण्याचे काम पडू नये यासाठी राज्यातील प्रमुख 107 केंद्रांवर कापसाच्या खरेदीस प्रारंभ झाला असून शेतकऱ्यांनी एफक्यू प्रतीचा कापूस हमी दरापेक्षा कमी दराने  विक्री करु नये, असे आवाहन कापूस पणन महासंघाचे सर व्यवस्थापक यांनी केले आहे.
            केंद्र व राज्य शासनाच्या वतीने  सीसीआय व सीसीआय चे सबएजंट म्हणून कापूस पणन महासंघाद्वारे शासकीय नियमाप्रमाणे एफएक्यू दर्जाचा कापूस खरेदी करण्याकरिता पुढील प्रमाणे केंद्रांवर कापसाची खरेदी  17 नोव्हेंबर 2018 पासून सुरु केली आहे.

हंगाम 2018-19 मध्ये सीसीआय व कापूस पणन महासंघाद्वारे
सुरु करण्यात आलेली कापूस खरेदी केंद्रे

            नागपूर जिल्हा- सीसीआय : नरखेड, कापूस पणन महासंघ : सावनेर, पारशिवनी, कोहळी. वर्धा जिल्हा-  सीसीआय : वायगांव, हिंगणघाट, सेलू, सिंदी (रेल्वे), देवळी, खरांगणा, कापूस पणन महासंघ : जाम, तळेगाव(शाप). चंद्रपूर जिल्हा- सीसीआय : कोरपना, राजुरा कापूस पणन महासंघ : चंद्रपूर, चिमूर
            केंद्र शासनाच्या वस्त्रोद्योग आयुक्त, मुंबई यांनी कापसाकरिता निर्धारित केलेले वाणनिहाय गुणधर्म व दर खालीप्रमाणे आहे.
कापसाची जात -बन्नी/ ब्रम्हा, हमी दर (रुपये प्रती क्विं.) 5450, स्टेपल लेंग्थ (मि. मी.) 29.5-30.5, मायक्रोनिअर व्हॅल्यू (माईक)- 3.5-4.3.
कापसाची जात –एस-4/ एच-6, हमी दर (रुपये प्रती क्विं.) 5350, स्टेपल लेंग्थ (मि. मी.) 27.5-28.5, मायक्रोनिअर व्हॅल्यू (माईक)- 3.5-4.7.
कापसाची जात –एल, आर. ए., हमी दर (रुपये प्रती क्विं.) 5250, स्टेपल लेंग्थ (मि. मी.) 26.0-26.5, मायक्रोनिअर व्हॅल्यू (माईक)- 3.4-4.9.
            केंद्रांवर हमी दराने कापसाची विक्री करताना शेतकऱ्यांनी अद्ययावत पिकपेऱ्याच्या नोंदीसह 7/12, आधारकार्ड व बँकेच्या पासबुकाची झेरॉक्स प्रत सोबत ठेवण्याचे आवाहन कापूस पणन महासंघाचे सर व्यवस्थापक यांनी केले आहे.
****


No comments:

Post a Comment