प्र. प. क्र. 33
नागपूर, दि.07 : केंद्र शासनाच्या अधिसुचनेनुसार केंद्रीय मोटार वाहन नियम
1989 च्या नियम 125 (एच) नव्याने दाखल झाला आहे. या अधिसूचनेनुसार सर्व सार्वजनिक सेवा वाहनांची
व्हेईकल लोकेशन ट्रॅकींग डिव्हाईस व इमर्जन्सी बटन बसविणे 1 जानेवारी 2019 पासून
अनिवार्य करण्यात आले आहे. केंद्र शासनाने सदर अधिसुचनेनुसार सर्व सार्वजनिक सेवा
वाहनांची व्हेईकल लोकेशन ट्रॅकींग डिव्हाईस व इर्मजन्सी बटन बसविणे आवश्यक केले
असून, त्यामधून दुचाकी वाहने. ई-रिक्षा, तीनचाकी वाहने व ज्या वाहनांना परवाना
लागू नाही अशी वाहने वगळण्यात आलेली आहे.
विषयांकित सुधारणेनुसार बसविणाऱ्या उपकरणांचा तपशील आयएस:140:2016 या मानकानुसार व नंतर लागू होणाऱ्या बीएसआय मानकानुसार असून सदर उपकरण बसविणे
उत्पादक, विक्रेता व संबंधित चालनकर्ता, ऑपरेटर यांना बंधनकारक आहे. अधिसूचनेची अंमलबजावणी दिनांक 01 जानेवारी 2019 पासून करण्यात आली
आहे.
तरी जानेवारी 2019 पासून दुचाकी वाहने, ई-रिक्षा, तीनचाकी
वाहने व ज्या वाहनांना परवाना लागू नाही अशा वाहनाव्यतिरिक्त नवीन नोंदणी होणाऱ्या
सर्व सार्वजनिक सेवा (पब्लिक सर्व्हिस) वाहनांमध्ये विहीत मानकानुसार लोकेशन
ट्रॅकींग डिव्हाईस व इमर्जन्सी बटन
बसवल्याची खात्री करून मगच पुढील कामकाज करण्यात येईल याबाबत सर्व वाहन उत्पादक,
वाहन विक्रेते व वाहन धाकर यांनी नोंद घ्यावी, असे आवहन प्रादेशिक परिवहन अधिकारी,
नागपुर (शहर) यांनी केले आहे.
*****
No comments:
Post a Comment