Monday, 7 January 2019

विधानभवनातील पुष्प प्रदर्शनी येत्या 25 व 26 जानेवारीला


प्र. प. क्र.  32                                                      दिनांक 07 जानेवारी  2019

 नागपूर, दि. 7  :  शासनाच्या उपक्रम म्हणून 25 व 26 जानेवारी रोजी विधानभवन येथे 46 व्या पुष्प प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे.
            उपवने व उद्यानेसार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग, नागपूर यांच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यंदादेखील पुष्प प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे. या पुष्प प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी अर्ज दि.10 ते 17 जानेवारी 2019 पर्यंत उपवने व उद्याने कार्यालयात कार्यालयीन वेळेत उपलब्ध राहतील. पुष्प प्रदर्शनासाठी प्रवेश फॉर्म शुल्कासह भरण्याची अंतीम दि. 22 जानेवारी 2019 आहे. अधिक माहितीसाठी कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक 0712-2561425 वर संपर्क साधण्याचे आवाहन जे.व्ही.चौगुले, सहाय्यक संचालक, उपवने व उद्याने यांनी केले आहे. या पुष्प प्रदर्शनीत शोभिवंत झाडे विक्रीसाठी देखील उपलब्ध राहणार आहे.
                                                ***** 

No comments:

Post a Comment