Tuesday, 8 January 2019

‘रायगड ई-बुक’ चे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन

वृ.वि. 88                                                                                                                                                                                        दि. 8 जानेवारी2019

मुंबईदि. : रायगड जिल्ह्यातील पर्यटन स्थळांची समग्र माहिती पर्यटकांना उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून जिल्हा माहिती कार्यालय रायगड यांनी तयार केलेल्या रायगडःपर्यटन विविधा’, या ई-बुकचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. तसेच रायगड जिल्ह्यात येणाऱ्या सर्व पर्यटकांना माहिती देणाऱ्या मोबाईल ॲपचेही उद्घाटन करण्यात आले.
            मंत्रालयातील मुख्यमंत्री सचिवालयात समिती सभागृहात हा कार्यक्रम आज पार पडला. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाणपर्यटन राज्यमंत्री मदन येरावारनगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकरजिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशीजिल्हा नियोजन अधिकारी सुनील जाधव आदी उपस्थित होते.
            श्री. फडणवीस यांच्या हस्ते रिमोट कंट्रोलद्वारे या ई पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. हे ई- पुस्तक महाजालकावर www.raigadtourism.com येथे तसेच मराठी ई- पुस्तकांच्या सर्व दालनांवर उपलब्ध असेल. तसेच रायगड जिल्ह्याचे संकेतस्थळ www.raigad.nic.in येथेही या ई-बुकची लिंक उपलब्ध करण्यात आली आहे. तर मोबाईल ॲप मध्ये पर्यटनस्थळेनिवासभोजन सुविधामार्गनकाशेवाहन सुविधा आदींबाबत सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांचे पर्यटन सुकर होण्यास मदत होणार आहे.
            या पुस्तकात रायगड जिल्ह्यातील लेणीगड-किल्लेऐतिहासिक पर्यटनस्थळेधार्मिक स्थळे,  समुद्र किनारेसाहसी पर्यटनधबधबे आदी समग्र पर्यटन स्थळांची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
            श्री. फडणवीस यांनी जगभरातील मराठी वाचकांना रायगड जिल्ह्यातील पर्यटनस्थळांची माहिती पोहोचविणाऱ्या या उपक्रमाचे कौतुक केले.
००००

No comments:

Post a Comment