Tuesday, 8 January 2019

यवतमाळ नगर परिषदेला व्यापारी संकुलासाठी जागा देण्याच्या कार्यवाहीला गती द्या - मुख्यमंत्री

वृ.वि. 89                                                                                                                                                                                       दि. 8 जानेवारी2019

मुंबईदि. 8 : यवतमाळ नगरपरिषदेला व्यापारी संकुलसाठी टी.बी. हॉस्पिटल जवळची जागा देण्याच्या प्रक्रियेला गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले.
            यवतमाळ नगर परिषदेला टी.बी. हॉस्पिटलजवळी जागा महसूल विभागाकडून व्यापारी केंद्रासाठी देण्यासंदर्भात आज मंत्रालयात मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी यवतमाळचे पालकमंत्री तथा सामान्य प्रशासन राज्यमंत्री मदन येरावारनगर विकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकरनगर परिषद संचालनालयाचे संचालक एम. संकरनारायणनयवतमाळचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुखनगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा आदी यावेळी उपस्थित होते. राज्यमंत्री श्री. येरावार यांच्या पुढाकाराने ही बैठक आयोजित करण्यात आली होती.
            मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणालेनगर परिषदेला महसूल विभागाकडून जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नगर विकास विभागाने ही जागा नगर परिषदेच्या ताब्यात देण्याची कार्यवाही करावी. तसेच नगर परिषदेकडून सविस्तर प्रस्ताव आल्यानंतर व्यापारी संकुलाच्या बांधकामासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यासाठी मंजुरी देण्याची कार्यवाही करावी.
            श्री. येरावार म्हणालेनगर परिषदेने जागा ताब्यात घेऊन इमारत बांधकामासाठी निविदा प्रक्रियेसंबंधीचा प्रस्ताव येत्या आठ दिवसात नगर विकास विभागाकडे द्यावा.
०००

No comments:

Post a Comment